अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी तिरंगा यात्रा म्हसळा शहरात उत्साहात पार पडली. यात्रेला दि. 23 में रोजी सकाळी ११ वाजता श्री धाविर देव मंदिरा पासुन सुरवात झाली. मार्गात तांबट आळी सोनार आळी मार्ग म्हसळा पोलीस स्थानक ते दिघी नाका अशा पद्धतीने यात्रा संपन्न झाली. बाजारपेठेत यात्रा पोहचताच सर्वांनी हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी एकजुट दाखवली . म्हसळा तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व महिलांचा देखिल मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅली मध्ये उपस्थित होते.ऑपरेशन सिंदुर या भारतीय सैन्याच्या विशेष उपक्रमाच्या पाश्वभुमीवर आयोजीत ही यात्रा देशातील शुर जवानांच्या सन्मानार्थ बळकट करणारी ठरली… सदर रॅलीस मा. सभापती महादेव पाटील , भाजप तालुका अध्यक्ष महेश पाटील , प्रसाद बोर्ले , प्रसन्ना निजामपुरकर, भालचंद्र करडे, सौ. रेखा धारीया , त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.