खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
बाळासाहेब,उद्धवसाहेब,आदित्यजींचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिरीषदादा घरत यांना ओळखले जाते…शिवसैनिक,विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, विद्यमान जिल्हाप्रमुख अशी दादांची राजकीय वाटचाल आहे…२ जून हा जिल्हाप्रमुख शिरीषदादांचा वाढदिवस…दरवर्षी हा वाढदिवस शिवसैनिक मोठ्या उत्साहात साजरा करतात…बाळासाहेबांचे, उद्धवसाहेबांचे,आदित्यसाहेबांचे शिरीषदादा घरत निष्ठावंत शिवसैनिक…त्यामुळेच शिवसेनेच्या कठीण काळात शिरीषदादा आणि त्यांची टीम भक्कमपणे उद्धवसाहेबांच्या पाठी राहिली… बाळासाहेबांनी जे निष्ठेचे बाळकडू पाजले ते निष्ठावंतांच्या धमन्यात आजही आहे…असेच शिवसैनिक शिवसेनेचा आधार आहे… निष्ठा अधिक सेवा म्हणजे शिरीषदादा घरत …. दादांचा जन्म २ जून १९५९ साली शेतकरी परिवारात झाला… खारघर आणि पनवेल ही दादांची कर्मभूमी…शेतकरी परिवारातील एक तरुण आज राजकारणाच्या उच्च शिखरावर विराजमान आहे…शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख आणि आता लोकांच्या मनातील भावी आमदार अशी दादांची राजकीय वाटचाल असणार आहे… छत्रपती शिवाजी महाराज, घटनापती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रकल्पग्रस्तांचे दैवत दि.बा.पाटील, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांसह सर्व राष्ट्रपुरुष शिरीषदादांचे आदर्श आहेत… सत्ता असताना शिवसेनेच्या माध्यमातून शिरीषदादांनी अनेक विकासकामे केली… तशीच विकासकामे सत्ता नसतानाही पुढे सुरु आहेत… १९७५ पासून दादांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली… त्याच्याआधी शिवसैनिक ही ओळख होतीच…. स्वतः खारघर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर खारघर ग्रामपंचायतीवर २ वेळा शिवसेनेचा सरपंच बसविला… शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चात शिरीषदादांचा सहभाग आहे… राजकारणाबरोबर शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी केली… बेलपाडा स्कूल कमिटीवरील कार्य वाखाणण्याजोगे आहे…. खारघर विभागातील विविध मंडळे, शाळा, महाविद्यालये यांना नेहमी मदत केलीय… शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड ही जबाबदारी २२ ऑक्टोबर २०१८ पासून खांद्यावर घेतली… पनवेल विधानसभा मतदार संघातील अनेक विकासकामे ही शिरीषदादांची ओळख… तर दादांचे मुख्य सामाजिक कार्य म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी… त्यातून अनेकांना वाहने देऊन रोजगार दिला… याशिवाय श्रीपुष्प प्रतिष्ठान फाऊंडेशन अंतर्गत स्वर्गीय अखंड सौभाग्यवती पुष्पाताई शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ विनामूल्य महाआरोग्य शिबीर घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा केली जाते… तसेच अनेक पेशंटना खाजगी मदत दिली जाते ती वेगळीच… शिरीषदादांनी कठीण काळात उद्धवसाहेबांना साथ देऊन पनवेल विधानसभा मतदारसंघात २२ हजार सदस्य नोंदणी केली… शिवसेनेच्या भवितव्यासाठी अशी नोंदणी महत्वाची होती …म्हणून दादांनी रात्रीचा दिवस केला…राजकीय दहशतवादाविरोधात मोर्चा, नैना विरोधात आंदोलन ही ठळक कामगिरी म्हणून नोंद आहे… हजारो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवून दिला… तर अनेकांची परदेशात शिक्षणाची सोय केली…परदेशी जाणाऱ्या खेळाडूंनाही वारंवार मदत केल्याचे जाहीर आहे…असा शिरीषदादा घरत यांचा विकासकार्याचा झंजावात आहे..हा झंजावात शब्दरूपात बंदिस्त होऊ शकत नाही…त्यामुळेच दादांच्या सामाजिक कार्याला सलाम ठोकून त्यांच्या वाढदिवशी … म्हणजेच २ जूनला शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे… आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे… आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो… अशा शब्दरूपात शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलकडून शुभेच्छा…देत आहोत…