रायगड जिल्ह्यातील गावागावात संघटनेचे विचार आणि ध्येय-धोरणे सर्वत्र पोहोचवण्या संबंधी सखोल चर्चा…

0
7

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

दिनांक:- ०१ जून २०२५सकाळी ११:०० वा. रोजी निर्धारित मीटिंग संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रविणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली यावेळी रायगड जिल्हा सचिव शिवश्री प्रदीप(अप्पा) पार्टे,किसन गोलांबडे- पोलादपूर तालुका संघटक,मनोज जाधव-पोलादपूर शहराध्यक्ष,शिवश्री कैलास पुंडलिक अटक – महाड तालुकाध्यक्ष,शिवश्री महेश मेहता-महाड शहर अध्यक्ष,शिवश्री सुजित सुतार-महाड तालुका उपाध्यक्ष,शिवश्री नितेश पवार-महाड तालुका सचिव,शिवश्री संतोष रक्ते-महाड शहर उपाध्यक्ष, शिवमती हर्षदा सुतार-रायगड जिल्हा संघटक,शिवमती नंदाताई काप-महाड तालुका प्रमुख,शिवमती निशा संतोष रक्ते,शिवमती सुवर्णा शरद पवार,संकेत खेडेकर, रुचित गायकवाड,अभिजीत तोडकर,संकेत रेनोहरे,श्रीकृष्ण पवार,विशाल जाधव आदि अनेक जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यापैकी काही ठळक विषय खालीलप्रमाणे:

पहिला मुद्दा
रायगड जिल्हा महाड तालुक्यातील मुख्य शहरामध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभे करण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करणे

दुसरा मुद्दा
प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये- कार्यालयामध्ये तसेच शासकीय-निमशासकीय शाळेमध्ये
राजमाता जिजाऊ मासाहेब,छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमा लावली आहे की नाही याची खात्री करून लावली नसल्यास संभाजी ब्रिगेड संघटनेकडून प्रतिमा संबंधित विभागाला सप्रेम भेट देऊन प्रतिमा लावण्यास प्रवृत्त करणे.

तिसरा मुद्दा
रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यासह सर्वच तालुक्यामध्ये सर्व जाती-जमातींसाठी, नागरिकांसाठी शासकीय सोयी सुविधा, आर्थिक सहाय्य आणि अधिकाररुपी शिबिर आयोजित करून जनजागृती करणे तसेच महाड तालुक्यामध्ये वृक्षारोपण करणे

चौथा मुद्दा
संभाजी ब्रिगेड संघटना वाढीसाठी संघटनेचा प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामधील प्रत्येक गावागावात निर्माण करून संघटनेचे विचार आणि ध्येय-धोरणे सर्वत्र पोहोचवणे यासंबंधी सखोल चर्चा करण्यात आली…