रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची माफी मागून त्यांचे पाय धरा अन्यथा कर्जत खोपोली मधील पुढचा आमदार सुधाकर घारे असतील असा इशारा राष्ट्रवादीचे रोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी आमदार थोरवे यांना दिला आहे. आमदार थोरवे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती…यानंतर रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांच्याविरोधात राग व्यक्त केला.आता रोहा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष कोलटकर यांनी सुद्धा थोरवे यांना इशारा दिला आहे. आमदार थोरवे यांनी पुन्हा आमच्यासमोर उभे राहून दाखवा तेव्हा आम्ही राष्ट्रवादीची सुधा ताकद दाखवून देऊ सुनिल तटकरे हे तुमच्या जिवावर खासदार झालेले नसून त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते खासदार झाले आहेत असे वक्तव्य कोलटकर यांनी करत थोरवे विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.