महिला व बाल विकास मंत्र्यांच्या गावातच महिला व मुली असुरक्षित… चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत मुलीचे वारंवार शोषण…

0
13

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे गावात महिला शोषणाची घृणास्पद घटना घडली होती.त्यानंतर उसर येथे आता पुन्हा एकदा त्याच घटनेची पूर्ण वृत्ती झाली आहे. उसर येथील एका 14 वर्षीय मुलीवर दुष्कृत्य झाल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अश्लील चॅटिंग वायरल करायची धमकी देत या मुलीचे वारंवार शोषण करण्यात आले अशा संदर्भात मुलीच्या आई-वडिलांनी देवेश रविंद्र सावंत, वय २५ वर्षे, रा.रा.तळवली, व ओमकार संजय पिंपळे, वय २५ वर्षे, रा. नागोठणे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी देवेश सावंतला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीवरून या मुलीच्या इस्टाग्रामवर ओमकार पिंपळे हा घाणेरडे मॅसेज करत होता. ते मेसेज देवेश सावंतच्या हाती लागले. त्यानंतर देवेशने ती सर्व चॅटींग व्हायरल करेन अशी धमकी देत मुलीचा गैरफायदा घेतला.याबाबत कोणालाही सांगितले तर तुला मारून टाकेल अशी धमकीही त्याने मुलीला दिली होती. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेने रोहा परिसरात खळबळ माजली आहे. महत्वाची बाब म्हणजे महिला व बाल विकास मंत्र्यांच्या गावातच महिला व मुली असुरक्षित असल्याची भावना यामुळे परिसरात पसरली आहे. दरम्यान, रोहा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.