रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत आहे… आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून एकहाती सत्ता प्रस्थापित करायची आहे… भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहोत. रायगड जिल्ह्यात भाजपचेच सरकार बसले पाहिजे… या दृष्टीने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. तर रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार )यांच्यात संघर्ष सुरू आहे. शिवसेना राष्ट्रवादी चा तिढा सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्री पद भाजपला द्यावे असे मोठं भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते,तथा आमदार रविशेठ पाटील यांनी केलं आहे. भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या महत्वपूर्ण पुढाकार व सहकार्याने पाली मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असे सुसज्य व भव्य सुधागड तालुका भाजप संपर्क कार्यालय उपलब्द झाले आहे. या संपर्क कार्यालयाचे शानदार उदघाटन राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई, गीताताई पालरेचा, राजेश मपारा, आलाप मेहता, दादा घोसाळकर, श्रीकांत ठोंबरे, आरिफ मणियार, प्रणाली शेठ,पराग मेहता, नरेश खाडे, राजेंद्र गांधी,सुशील शिंदे, अजय खंडागळे,ऍड: आरती गुप्ता, शिरीष सकपाळ, सरपंच प्रणिता खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रविशेठ पाटील बोलत होते. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीच्या बल्लाळ नगरीत भव्य व देखणे कार्यालय उपलब्द करून दिल्याबद्दल प्रकाशभाऊ देसाई यांना खासदार धैर्यशील पाटील,रविशेठ पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले.