सर्वपितृ अमावस्या असल्याने चौक बाजार पेठेत विक्रेत्यांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी…

0
4

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे, घास म्हणजे काकवळ ठेवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या चौक बाजार पेठ येथे मोठ्या प्रमाणात विक्रेते यांची व भाजी खरेदी करणारे यांची मोठी गर्दी झाली होती.

आज सर्वपितृ अमावस्या असल्याने चौक बाजारात भाज्यांचा बाजार भरला होता.गावठी भाज्या, घास ठेवण्यासाठी विशिष्ठ वनस्पतीचे पण, केळीची पाने,चवेन यांच्या पानांबरोबर वेगवेगळी फुले देखील विक्री साठी उपलब्ध होती,चिरलेली आणि वाटे घातलेल्या भाज्या देखील होत्या.आजचा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित करण्याचा आहे. आज पितरांचे श्राद्ध केले जाते,ज्यामुळे त्यांना मुक्ती मिळते आणि कुटुंबाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो,असे शास्त्र सांगते. आज तर्पण,पिंडदान आणि त्यांना घास म्हणजे काकवळ नैवेद्य अर्पण करण्यात येतो.आज हे विधी केल्या नंतर पितृदोष दूर होतात आणि घरात शांती व समृद्धी येते असेही सांगितले जाते.हे केल्याने

पूर्वजांना मुक्ती मिळते.ज्या पितरांच्या मृत्यूची तारीख व तिथी माहीत नसते त्यांचे श्राद्ध आजच्या दिवशी केले जाते. आज केलेल्या विधींमुळे पितृदोष कमी होतो आणि पूर्वजांचे आशिर्वाद मिळतात आणि कुटुंबात शांती, सुसंवाद आणि समृद्धी घेऊन येतात.श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जातात काही ठिकाणी नदीत स्नान करून दानधर्म केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आजचा विधी होतो.