रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे असे असले तरी बाहेरच्या राज्यातून गुटखा आणून तो चढया दराने महाराष्ट्रात विकून नफा कमविणार्या अनेक टोळया कार्यरत आहेत.मात्र रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच ऐवद्यरित्या धंदे चालणार्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यावर जरब बसविण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात कुठेही अवैधरीत्या धंदे सुरु असल्यास तशी माहिती असल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला व स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना १३ सप्टेंबर रोजी विमलपान मसाला व गुटख्याची अवैध वाहतुक सावरोली टोलनाका येथुन मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने एका टेम्पोतून होणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पथकाला पाचारण केले.दरम्यान, एक छोटा हत्ती टेम्पो सावरोली टोल नाका रोड कडुन खालापुर बाजुकडे येतांना दिसला.त्यावेळी पोलीसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.परंतु टेम्पोचालक गाडी थांबवुन अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या व खाकी बारदानच्या गोणींमध्ये विमल पानमसाला व गुटखा असल्याचे निर्देशनास आले. यामध्ये १० लाख ८९ हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला असलेल्या खाकी रंगाच्या बारदानामध्ये २५ सफेद रंगाच्या १२ नायलॉनच्या गोणी,९ हजार रुपये किमतीचे,३ लहान गोणी,१०लाख ८९ हजार रुपयाचे व वाहतुकीसाठी वापरलेला ४ लाख रुपयाचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण १६ लाख ६६ हजार रुपयांचा साठ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यामुळे रायगड गुन्हे अन्वेषण शाखेचे व खालापूर पोलीसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.
ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, खालापुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल मेहुल,कर्जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे,खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील,गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील,सहाय्यक फौजदार मोहन भालेराव,बाळकृष्ण जाधव,आशिष पाटील या पथकाने केली.
कागदावर गुटखाबंदी असली तरी राज्याच्या कानाकोपर्यात गुटखा राजरोस विक्री होताना दिसत आहे.राज्य शासनाने १३ वर्षापूर्वी गुटख्यावर बंदी घातली आहे.तरी देखील गुटखा तस्करांनी अवैधरित्या गुटखा तस्करी सुरू ठेवली आहे.अशातच पुणे-मुंबई महामार्गावरून एका टेम्पोमधून होणार्या विमलपान मस्राला व गुटख्याची होणारी तस्करी उपडकीस आली आहे.खालापुर पोलिसांनी सावरोली टोलनाका येथे सापळा रचून धड़क कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.या कारवाईत टेम्पोसह साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात गुटखा खाण्याच्या आहारी जात आहे.त्याचप्रमाणे गुटख्याच्या सेवनामुळे फुफ्फुस,तोंड आणि आतड्यांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण विचारातत घेऊन तत्कालीन सरकारने २०जुलै २०१२ रोजी राज्यात गुटखाबंदी लागू केली होती.असे असतानाही छुप्या पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे गुटखाबंदीवर ठोस कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.