माथेरान शॉर्लोट तलावात तीन पर्यटक बुडाले… फिरण्यासाठी १० जण आले आणि पोहण्यासाठी तिघे गेले…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान येथे नवी मुंबई येथील येथून आलेल्या दहा पर्यटकांच्या समूहातील सुमित चव्हाण (16), आर्यन खोब्रागडे (19) आणि फिरोज शेख (19) तीन जण शॉर्लोट तलावात बुडाले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती माथेरान पोलिस स्टेशन ठाण्याकडून प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच माथेरान येथे तीन तरुण बुडाल्याची घटना समोर आली असल्याने माथेरान येथे हळहळ व्यक्त होत आहे…

कर्जत तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण गिरीस्थान माथेरान येथे नवी मुंबई येथून दहा मित्राचा समुह आज आले होते. आलेले दहा जण पोहण्यासाठी शॉर्लोट तलावात उतरले होते. यापैकी चव्हाण (16), आर्यन खोब्रागडे (19) आणि फिरोज शेख (19)  जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावाच्या पाण्यात बुडाले असल्याची घटना घडली असून बुडालेल्या पर्यटकांचा शोध सह्याद्री सेस्क्यू टीम आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी बचाव कार्य करीत आहे.

माथेरान पर्यटनस्थळी फिरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. इको पाईंट, मंकी पाईंट, लायन्स पाईंट असे अनेक पाईंट माथेरानमध्ये आहेत. यापैकीच एक आहे ते शॉर्लोट तलाव हा पाईंट. अनेक पर्यटक तलावाजवळ फोटो काढतात तसेच पोहण्याचा आनंद लुटतात. याच शॉलोंट तलावात तीन पर्यटक बुडाले आहेत.

दहा जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी तिघेजण बुडाल्याची माहिती मिळते आहे. सह्याद्री सेस्क्यू टीम आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी बचाव कार्य करीत आहे. अन्य बचाव पथकेदेखील घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी माथेरान पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनाने यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.