माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसारनुसार कोकणात ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळून मातीचे ढिगारे पडले आहेत… अशीच एक घटना माणगावमध्ये घडली आहे…
रायगडच्या माणगाव तालुक्यातील घरोशी मार्गावर दरड कोसळली असून सलग तीन दिवस कोकणामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केले, त्यामुळे रायगड,रत्नागिरीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही