रायगडमधील पोलिसांच्या समुपदेशनाने केल्या बदल्या… इच्छेनुसार बदल्यांमुळे पोलीस दलात समाधानाचे वातावरण…

0
34

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

रायगड पोलिस दलातील ५०० सहायक उपनिरीक्षक, अंमलदारांची बदली प्रक्रिया खुल्या आणि पारदर्शक समुपदेशन प्रणालीद्वारे करण्यात आली…ज्येष्ठता यादीनुसार कर्मचाऱ्यांना बोलावून रिक्त जागा आणि पदे दाखवून समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पडली…त्यामुळे पहिल्यांदाच समुपदेशनाने रायगड पोलिस दलातील बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे…
रायगड पोलिस दलात दरवर्षी बदली प्रक्रिया होत असते…अशावेळी कोणाची तरी ओळख दाखवून बदली केली जात होती…त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता…नव्याने जिल्हा अधीक्षकपदी रुजू झालेल्या आंचल दलाल यांनी या गोष्टीला थारा न देता समुपदेशनाने बदली प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे ज्याला जे हवे ते पोलिस ठाणे, विभाग मिळाला आहे. यावेळी अपर जिल्हा अधीक्षक अभिजित शिवतारे उपस्थित होते.

ज्या सहायक उपनिरीक्षक, पोलिस अंमलदार यांनी एका पोलिस ठाण्यात पाच वर्षे किंवा विभागात १२ वर्षे सेवा दिली असेल त्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवार, १३ जून रोजी ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली…