अलिबाग वडखळ रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकार उदासीन का?…पंडीत पाटील… अलिबाग, मुरुड, रोहा रस्त्यांवर  कोट्यवधींचा खर्च…

0
25

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यातील अलिबाग वडखळ रस्ता मीनाक्षी ताई पाटील आमदार असताना मंजूर केला होता… २०१४ आणि २०१४ नंतर किरकोळ दुरुस्तीचा खर्च वगळता खर्च झाला नाही… मात्र, अलिबाग, मुरुड, रोहा या मतदारसंघातील रस्त्यावर भरपूर खर्च झालाय… कार्ले खिंड, सारळ  रस्ता हा सुटसुटीत होता…. पण त्यावर एम.एम.आर.डी.च्या माध्यमातून ३०० कोटी रुपयांचे एस्टीमेड झाले तसेच काम चालू आहे… कार्ले खिंड, कणकेश्वर फाटा शास्त्री चौक याला १५० कोटी खर्च झालाय… परंतु हा जो मेन रस्ता आहे त्यावर राज्य सरकार उदासीन का आहे? … असे पंडित पाटील शिवसत्ता टाइम्सशी बोलताना सांगितले….
याविषयी पंडीत पाटील यांनी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा विषय काढला व त्या संबंधित अनेक बैठका झाल्या… हा रस्ता नॅशनल हायवेला आहे की, सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे, हे निश्चित न झाल्याने आज अलिबाग वडखळ रस्त्यामध्ये लोकांनी वारेमाप फेरीवाले बसतात… आधीच हा रास्ता ट्रॅफिक जॅम होत असतो त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी लोकांनी भराव केले आणि पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले… त्यामुळे रस्त्याची अवस्था भयानक झाली आहे… कार्ले खिंडीत झाड पडले तेथे पोलीस उपस्स्थि होते परंतु कुठली यंत्रणा यायची हे पोलिसांना माहीतच नाही….
पंडित पाटील यांनी शिवसत्ता न्यूज चॅनेलच्या माध्यमातून बोलताना सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्याचे प्रमुख  कलेक्टर साहेबही या रस्त्याने जातात… जर आमच्या सारख्या लोकांना या गोष्टी समजतात तर सरकारने वारेमाप जे अधिकारी नेमलेत त्यांचं काम काय आहे?… ते आपत्ती व्यवस्थापनाची बैठक करतात पण पुढची बैठक पुढच्या वर्षी घेतात… तर पंडित पाटील यांची सरकारकडे मागणी आहे की, अनेक रस्ते तुम्ही मंजूर केलेत पण अलिबाग वडखळ रस्ता मंजूर करण्यासाठी काय अडचण येते?… लोकं गाजर दाखवतात की, अलिबाग रस्ता होईल पण राज्यसरकारकडे जमिनीचे पैसे नाहीत. पण हे होईल तेव्हा होईल पण ते अन्य रस्त्यावर वारेमाप खर्च करण्यापेक्षा जो मेन रस्ता आहे या रस्त्यावर अंतुले साहेब, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील हे असताना हा परिवरचा ब्रिज झालाय, नवीन प्रोजेक्ट झालाय त्याची अवजड वाहतूक यावरून होते….
ब्रिज पडल्यानंतर खोटं-खोटं सांत्वन करायचं आणि राज्यसरकार त्यांना पाच लाखाची मदत घोषणा करते. या घटना घडण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे सगळे विषय घ्यायला पाहिजे…. या विषयी वारंवार पाठपुरावा केला, संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली.  शिवेंद्र राजे यांनी भेटून या संदर्भात बैठक लावावी,असे सांगितले… त्यांनी या संदर्भात आश्वासित मिटींग लावण्यासाठी रायगडच्या कलेक्टरकडे वारंवार बैठका घेतल्या पण त्याला मर्यादा असल्यामुळे ते या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून बांधकाम मंत्र्यांकडे आवाज उठवून या संदर्भात निर्णय घेण्यास सांगितले आणि रस्ता कोणाच्या मालकीचा आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले. तर या सरकारी यंत्रणेने अशा घटना होण्यापासून रोखणे गरजेचे आहे. पंडितशेठ पाटील यांनी अलिबाग तहसीलला विनंती केली कि, भविष्यात अनेक संकटाना सामोरे जायचे आहे म्हणून जिल्हा प्रशासनाने अलर्ट राहणे आवश्यक आहे.