दैनिक पुढारीच्यावतीने कोकणातील ‘आदर्श सरपंचांचा सन्मान’… माजी सरपंच अमित नाईक यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान… 

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

कोकणातील ‘आदर्श सरपंचांचा सन्मान’ आणि ‘आदर्श गाव बनवू या’ अशी मोहिम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोहळा दि.18 जून 2025 रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला…ग्रामविकास, पंचायत मंत्री श्री. जयकुमार गोरे आणि श्री. भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला…कोकणातील रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील 40 आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान केला गेला…सन्मानित करण्यात येणाऱ्या आदर्श सरपंचांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक यांना आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला… अमित नाईक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ग्रामविकास स्वछता,महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरले आहे… त्यांनी केलेल्या या विविध उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे…त्यांच्या या कामाची दखल घेत दैनिक पुढारीच्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याचे शिवसत्ता टाइम्सशी बोलताना सांगितले…आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही सरपंच अनेक कामे करू शकतात. त्यासाठी अधिक जागरूक राहून सरपंचांनी काम केल्यास ते दीर्घकाळ सर्वांच्या लक्षात राहते…अमित नाईक यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…
या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी ज्यांचा सहभाग मोलाचा आहे असे आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. प्रितम म्हात्रे आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यावेळी उपस्थित होते…