रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-
वरसे ग्रामपंचायतचे सरपंच रामा शेठ म्हात्रे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
दैनिक पुढारीतर्फे गौरव – मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला…वरसे ग्रामपंचायतचे सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व रामा शेठ म्हात्रे यांना दैनिक पुढारी या दैनिकाकडून “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करण्यात आला… ग्रामीण भागातील उत्तम प्रशासन, विकासकामांवरील भर आणि लोकांशी असलेली थेट बांधिलकी या बाबींचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे…हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री जयकुमार गोरे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला…या गौरवप्रसंगी सरपंच रामा शेठ म्हात्रे यांना विविध स्तरांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या…रामशेठ म्हात्रे हे खासदार सुनील तटकरे व वरसे ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा मधुकर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात… त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीत विविध मूलभूत सुविधांबाबत सकारात्मक कामे पार पाडण्यात आली आहेत…
ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा योजना, रस्ते डांबरीकरण, स्वच्छता अभियान, महिला बचत गटांना प्रोत्साहन तसेच युवकांसाठी खेळाच्या सुविधा यासारखी अनेक कामे त्यांनी यशस्वीपणे राबवली आहेत… गावातील सर्वसामान्य नागरिकांशी 24 तास संपर्कात राहून त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवणारे म्हणून रामा म्हात्रे यांचे नाव घेतले जाते… या पुरस्कारामुळे त्यांचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल आणि वरसे गावाचा विकास आणखी वेगाने होईल, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे…