चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
मुंबई,पनवेल, चौक दिशेकडून कर्जत कडे जाणाऱ्या चौक कर्जत फाटा येथे बेशिस्त वाहन चालक यांच्या मुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, त्याचा त्रास स्थानिक वाहन चालक यांच्याबरोबर वाहतूक पोलीस यांना होताना दिसत आहे.आज शनिवार उद्या रविवार दोन्ही दिवस शहरी भागातील लोकांसाठी पिकनिक डे.चौक कर्जत मार्गावर आणि कर्जत तालुक्यात असलेल्या रिसॉर्ट, हॉलिडे होम, बंगलो, हॉटेल,फार्महाऊस आणि स्वतःच्या मालकीचे असलेल्या ठिकाणी जाण्यास मुंबई, नवी मुंबई,ठाणे येथून येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होत असते. त्यांच्या मालकीच्या गाड्या चौक कर्जत मार्गावर जाण्यासाठी स्पर्धा लागल्यासारख्या मागेपुढे धावत असतात. त्यामुळे या मार्गावर प्रवेश करताना प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वळणावर बस स्टॉप, रिक्षा स्टँड, लागूनच हॉटेल आहे.बेशिस्त वाहन चालक गाडी पुढे नेण्याच्या नादात लाईन ची शिस्त बिघडून लावतात,त्यामुळे एक गाडी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरी मागून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते, याठिकाणी दुभाजक नसल्याने वाहन चालक यांना मोकळा रस्ता मिळतो आणि ते शिस्त बिघडून लावतात, शनिवार व रविवार येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतात, या गाड्यांमधून अर्धे अधिक VIP असता, किंवा VIP स्टिकर लावलेली वाहने असतात, त्यामुळे पोलीस देखील जास्त ताण घेत नाहीत.या वाहतूक कोंडी चा त्रास स्थानिक नागरिकांना, स्थानिक वाहन चालक यांना जास्त होतो.