लोकनेते स्वर्गीय दि. बा.पाटील साहेबांचा १२ व्या स्मृतिदिन… महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या पवित्र प्रतिमेस विनम्र अभिवादन…

0
8

पनवेल शिवसत्ता टाइम्स (न्यूज ब्युरो) :-

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे, गरिबांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ आदरणीय लोकनेते स्वर्गीय दि. बा.पाटील साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पवित्र प्रतिमेस विनम्र अभिवादन केले !!
शेतकरी, कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या धगधगत्या लोकनेत्याच्या कार्याची प्रेरणा आजही त्यांच्या आठवणींतून आणि कार्यातून जिवंत आहेत…

 

दि.बा.पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला… यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र (बाळ) माने साहेब, हे म्हणाले की, दि.बा.पाटील साहेब यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी रयतेसाठी त्यांच्या हितासाठी चळवळीची ज्योत सर्वसामान्य जनता व कष्टकरी जनतेकरिता पेटवली… त्यांनी केलेले कार्य हे चिरंतर अशा प्रकारचे आहे… असे आदरणीय आपले सर्वांचे आदरणीय दि.बा.पाटील यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे… त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते भविष्यात कार्यरत राहणार आहोत हीच खऱ्या अर्थाने त्यांना आमच्याकडून आदरांजली असेल….

 

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र (बाळ) माने साहेब, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील साहेब, रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शेकाप नेते काशिनाथ पाटील, शेकाप नेते नारायण घरत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते !

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!