वरसोली येथे वेश्या व्यवसायावर कारवाई…एक महिलेसहित एक आरोपी अटकेत…

0
9

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

रायगड जिल्ह्यातील पर्यटन प्रिय असणाऱ्या अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली येथील लोटस कॉटेज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करीत पीडित महिलेची सोडवणूक करीत एक महिला सहित एक असे दोन आरोपीस अटक करण्यात आली असून, याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई अनिकेत अनिल डिवरे यांनी दिली आहे…

मुंबई पुणे पासून एक दिवसीय पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड ही ठिकाणे जवळ असल्याने पर्यटक हे मोठ्या संख्येने येत असतात…. मात्र या पर्यटकांमध्ये काही आंबट शौकीन पर्यटक देखील असतात…. अलिबाग पोलिस ठाणे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, अलिबाग शहर लगत असलेल्या वरसोली ग्रामपंचायत हद्दीत दिनांक २४ जून २०२५ रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास लोटस कॉटेज येथे सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करीत महिला आरोपी (वय ५० वर्षे सप्या रा.कमलकुंज बिल्डीग समोर, ममता नगर त्ता अलिबाग रायगड मुळ रा. राजालाठपारा, ता.कैनीग दक्षिण २४ परगाना राज्य पश्चिम बंगाल) व राजेश रामलखन चौपल( वय २५ वर्षे रा. घरभंगा) या लोटस कॉटेज या आस्थापनेचा कुंटनखाना म्हणून वापर करीत तसेच पीडित मुलीस लोटस कॉटेज ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना वेश्या  व्यवसायासाठी पुरूष गि-हाईक पुरविले… यावेळी आरोपीकडून पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे….

याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात  गु.र.नं. १११/२०१५ भारतीय न्याय संहिता कलम १४३,३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे हे करीत आहेत….