माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके ):-
रायगड जिल्ह्यातील माणगावमधून वाहणाऱ्या काळ नदी पात्रात महाकाय मगरींचा वावर वाढताना दिसत आहे…. या महाकाय मगरी पाहण्यासाठी काळ नदी किनारी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे… हा व्हिडीओ माणगाव पोलिस स्थानकाच्या मागील बाजुच्या नदी पात्राचा असून, यामध्ये दोन महाकाय मगरी किनाऱ्यावर दिसून येत आहेत…. निसर्गप्रेमी, प्राणी मित्रांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…