६ महिन्यापासून हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलांची होतेय कुचंबना… पोलिस अधीक्षक कार्यालयात रूमचे रुपांतर हिरकणी कक्षात स्थापन…

0
8

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात असणारा हिरकणी कक्ष हा गेल्या सहा महिन्यापासून बंद करून त्याच्या वापर इतर साहित्य ठेवण्याच्या कामासाठी केल्याने महिला कर्मचारी यांच्यासहित कामानिमित पोलिस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे…
तत्कालीन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलिस अधीक्षक कार्यालयात तसेच जिल्ह्यातून कामानिमित येणाऱ्या महिला तसेच स्तनदामाता यांची अनेकवेळा होणारी कुचंबना लक्षात घेऊन त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात असणाऱ्या एका रूमचे रुपांतर हिरकणी कक्ष स्थापन केले होते…याचा फायदा जवळपास वर्षभर महिलांनी घेतला…
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून सदर हिरकणी कक्ष बंद करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्या ठिकाणी गुन्हे संदर्भात आवश्यक असलेली यंत्रणा आणून त्या रूममध्ये ठेवली आहे…तेव्हापासून हिरकणी कक्ष अभावी महिला यांची कुचुबना मोठ्या प्रमाणात होत आहे…
पोलीस अधीक्षक कार्यालयात’हिरकणी कक्ष’बंद असल्याने  महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.अनेक ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष किंवा स्तनपान कक्ष नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत…
पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, जसे की विश्रांती कक्ष, स्तनपान कक्ष (हिरकणी कक्ष) नसल्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो…महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बाळं असल्यास त्यांना स्तनपान किंवा त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी जागा मिळत नाही,ज्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो…
महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या सोयी-सुविधा असलेले हिरकणी कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालयात असणे गरजेचे आहे.हिरकणी कक्ष नसल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची कामावर अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि त्यांना कामाच्या ठिकाणी अधिक तणाव जाणवू शकतो…त्यासाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्ष  असणे खूप महत्वाचे आहे कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे…अशी माहिती एक महिला पोलिस कर्मचारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.