जातीवाचक शब्द वापरत मारहाण केल्याप्रकरणी बाराजणाविरोधात गुन्हा दाखल…

0
6

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यातील डॉ.एन.वाय. तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,चांदई येथे जातीवाचक शब्द वापरत मारहाण केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अर्हन्त मनोज लेंडाणे ( वय २१वर्षे, व्यवसाय-शिक्षण,रा. रूम नं एफ ०२ एस.इ.एस बॉयज हॉस्टेल, डॉ. एन. वाय. तासगावकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, चांदई ता. कर्जत जि. रायगड) यांनी विजय ढोणे,रोहन जावने,तन्मय कापरे,मिल्खा सिंग,मयूर पवार,संदेश काळे, आफताप मूजावर,प्रशिक कांबळे, तेजस गवित, वेदांतसानप , गौरव मडके, ओंकार लोहार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

यांबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मौजे चांदई येथे .एन.वाय. तासगावकर कॉलेज ऑॅफ फिजिओथेरपी येथे शिक्षण घेत असून एन.वाय. तासगावकर कॉलेज वसतिगृहामध्ये फिर्यादी अर्हन्त मनोज लेंडाणे हे राहत आहेत.अर्हन्त लेंडाणे व विजय ढोणे,रोहन जावने,तन्मय कापरे,मिल्खा सिंग,मयूर पवार,संदेश काळे, आफताप मूजावर,प्रशिक कांबळे, तेजस गवित, वेदांतसानप , गौरव मडके, ओंकार लोहार हे एकमेकांचे ओळखीचे आहेत.फिर्यादी अर्हन्त लेंडाणे हा महार समाजाचां आहे .हे विजय ढोणे,रोहन जावने,तन्मय कापरे,मिल्खा सिंग,मयूर पवार,संदेश काळे, आफताप मूजावर,प्रशिक कांबळे, तेजस गवित, वेदांतसानप , गौरव मडके, ओंकार लोहार यांना माहिती आहे अर्हन्त लेंडाणे शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या वसतिगृहात जीवन या  रूममध्ये दिनांक ०२जून २०२५ रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास  फिर्यादी अर्हन्त लेंडाणे यांना यांतील विजय ढोणे,रोहन जावने,तन्मय कापरे,मिल्खा सिंग,मयूर पवार,संदेश काळे, आफताप मूजावर,प्रशिक कांबळे, तेजस गवित, वेदांतसानप , गौरव मडके, ओंकार लोहार यांनी अर्हन्त लेंडाणे.याला हातातील कडयाने तसेच बेसबॅल स्टिकने आणि हाताबूक्यानी मारहाण केली…परत अर्हन्त लेंडाणे जी पीन तीन या खोलीमध्ये घेऊन जात आरोपी विजय ढोणे,रोहन जावने,तन्मय कापरे,मिल्खा सिंग,मयूर पवार,संदेश काळे, आफताप मूजावर यांनी फिर्यादी अर्हन्त लेंडाणे यांना “” तु मारले आहे,तुझी आमच्या सोबत बसायाची लायकी नाही,आणि डॉक्टर बनायला आलास” तुझी चपराशी पण होण्याची लायकी नाही तु कमी मार्क घेवुन आलाय आणि आमच्या मध्ये बसलाय ‘ असे जातीवाचक बोलुन मारहाण केली. सदर घटना कोणालाही सांगू नये म्हणुन धमकी दिली तसेच कॉलेजमधील गोष्टी घरी व स्टापला फिर्यादी अर्हन्त लेंडाणे सांगतात असा गैरसमज करून घेवुन दि.२४जून २०२५  रोजी पुन्हा आरोपी विजय ढोणे यांने फिर्यादी यांना ०२जून २०२५  रोजी मारहाण करण्याची धमकी दिली होती.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात २६/०६/२०२५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्हन्त लेंडाणे यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे गुरनं. 159/2025, 115(2),118(2),351(2),352, 3(5), अनुसुचित जाती/जमाती अधिनिय , 1989 चे कलम 3(1)(r)(s), 3( 2) ( Va)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खालापुर विभाग, अतिरिक्त कार्यभार कर्जत विभागाचे विक्रम कदम हे करीत आहेत.