नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
नांदगाव तालुक्यात खळबळ माजवणारी घटना घडली आहे…साकोरा येथील सोलर प्लांटमधून हजारो रुपयांची कोपर वायर चोरी करणाऱ्या सराईत चोरांच्या टोळीचा पर्दाफाश नांदगाव पोलिसांनी केला आहे.भैयासाहेब बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. 274/2025 भा.दं.सं. 303(2), 317(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जयेश वाल्मीक गोडळकर, विशाल राजेंद्र सुरसे व अजगर सलीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले.
सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला,मात्र पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांनी खाकीचा रौद्र अवतार दाखवताच आरोपींनी कबुली दिली की चोरी केलेली वायर एमएच 41 एल 82 क्रमांकाच्या गाडीमधून अजगर शेखच्या भंगार दुकानात पोहोचवली होती.झडतीमध्ये सोलर प्रकल्पातील सुमारे ₹25,000 किंमतीची 600 मीटर कोपर वायर हस्तगत करण्यात आली आहे.आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या टोळीने तालुक्यात इतर ठिकाणी देखील चोरी केल्याचा संशय आहे.नांदगाव पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीला चपराक ठरत आहे…नांदगाव पोलिस निरीक्षक दिनकर भदाणे आणि त्यांच्या पथकाचे नागरिकांतून कौतुक होत आहे…