माथेरानमध्ये वाहतुकीचा सावळा गोंधळ… लवकरच तोडगा काढण्याची अशी पर्यटकांमधून मागणी…

0
10

माथेरान  शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

दर शनिवार रविवारी माथेरान येथे मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची मोठया प्रमाणावर निसर्गाचा  आनंद घेण्यासाठी गर्दी करतात… काही जण स्वतःची वाहने आणतात नेरळ – दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी वारंवार पहावयास मिळत आहे…. यावर लवकरच तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी  पर्यटकांमधून जात असून, प्रशासन मात्र डोळेझाक करून आहे….

ग्रामस्थांनी स्वतःहून रस्त्यावर येऊन वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता… आता नवीन बाब समोर येत आहे कि, प्रसासानाकडे एकच वाहतूक कर्मचारी आहे तो कुठे कुठे धावपळ करणार? कर्मचारी यांच्यात वाढ होण्याची आवशकता भासत आहे… तेव्हाच वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे…. पोलीस अधीक्षक आंचल दलाल याकडे लक्ष देतील का, व हा प्रश्न मार्गी लावतील का?