जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…

0
16

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-

अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेणे पालकांना दुरापास्त हाेते. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुख सचिन ठाकूर यांनी गरजुवंत जिल्हा परिषद कोपरा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, कंपास किट, वॉटर बॉटल इत्यादी वाटप केले .

यावेळी शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग मुख्याध्यापिका सावंत मॅडम, महानगर संघटक दीपक घरत, माजी सरपंच गुलाब पाटील, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, शिवसेना विभाग प्रमुख सचिन ठाकूर, शाखाप्रमुख प्रणित ठाकूर, सुयोग ठाकूर देवदास ठाकूर, रोशन ठाकूर, किरण कांबळे,महेश ठाकूर रोहिदास तोडेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गुरुनाथ पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठु शकतो. आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत यश संपादन करा असे मत व्यक्त केले.

नुकत्याच शाळा सुरू झाल्या असल्याने आई-वडिलांच्या डोक्यावर असलेला शैक्षणिक साहित्याचा भार कुठेतरी कमी व्हावा या भावनेतून जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला .