नवी मुंबई शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-
आगरी-कोळी बांधवांसह,महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील देशभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या मंदिराबाबत महत्त्वाची माहिती आहे.कार्लाच्या एकविरा आईच्या भक्तांसाठी मोठी बातमी आहे…मंदिरात दर्शनासाठी येताना कपड्यांबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. एकविरा देवीच्या मंदिरात अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे…
एकविरा आईचं आणि मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली असून ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलै पासून करण्यात येणार असल्याची माहिती कार्ला एकविरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे…शुक्रवारी कार्ला येथे आई एकविरा देवीच्या मंदिरात विश्वस्थ मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोड संदर्भात हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे…कार्ला येथील एकविरा आई लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असून राज्यासह देशातील अनेक ठिकाणाहून भक्त देवीच्या दर्शनाला येतात. मात्र काही भक्त अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून दर्शनाला येतात, त्यामुळे देवीचं तसंच मंदिराचं पावित्र्य धोक्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी विश्वस्थ मंडळाकडे आल्या होत्या. अनेक भक्तांनी सोशल मीडियाद्वारे ड्रेस कोड संदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्थ मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे…शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना बंदी घालण्यात आली आहे…महिला आणि मुलींनी साडी,सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत ज्याने पूर्ण अंग झाकलेलं असावं…कोणतेही अंग प्रदर्शन करणारे कपडे घालता येणार नाहीत…