खालापूर शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
गोदरेज ॲन्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ५० ते ६० आदिवासी शेतकरी बांधवांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीत जाणारा वहिवाटीचा रस्ता बंध केल्याने कष्टकारी शेतकरी बांधव शेती पासून वंचित राहिले असून शेतकरी बांधवांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा संताप आदीवासी शेतकरी बांधवानी व्यक्त करीत संविधानिक पद्धतीने मंगळवार दि. १ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३०वाजे पासून खालापूर तहसील कार्यालयच्या आवरात कलेक्टर साहेब जागे व्हा तहसीलदार साहेब जागे व्हा या घोषणाबाजी करत न्याय मांगण्या साठी भर पाऊसात धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.कलम ५ नुसार आम्ही आमच्या शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता मिळण्यासाठी आमची मांगणी आहे जो कंपनीने रोखला आहे.गोदरेज कंपनीच्या इशाऱ्या वरती कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब नासत्ता आहेत त्यामुळे आमचा निकाल देण्यासाठी ही लोकं उशीर करतात आहेत असा घानाघात आरोप आंदोलन करते शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही याठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली आहे जर एक दोन तसा मध्ये तहसीलदार सायबानी आम्हाला कोणता संदेश दिला नाहीं तर हे धरणे आंदोलन थांबून आमरण उपोषणाची घोषणा करीत या ठिकाणी संध्याकाळ पासून अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलन करते शेतकरी बांधव व भीम आर्मी संघटने कडून देण्यात आला आहे.
दि.२१मे २०२५ रोजी मंडल अधिकारी वावशी व ग्राम महसूल अधिकारी डोंणवत यांनी शेतकऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्यांच्या शेताची स्थळ पाहणी करून पंचनामा केला व पंचनामेत नमूद केला की स. नं. २०/२ व ३०/२ ही जमीन मिलकत सदय स्थितीमध्ये पड स्वरूपात असल्याची दिसून आली आहे . स्थल पाहणी वेळी प्रस्तुत जमीन या मिळकतीस सल्लगन पायवाट अथवा बैलगाडी रस्ता असल्याचे दिसून आले नाही.तेसच खालापूर तहसीलदार यांना देखल बिनशेती (NA order)साठी दिलेला आदेश रद्द करण्याबाबत मंडळअधिकारी कार्यालय वावोशी यांच्या कडून जावक क्र:मं. अ. वावोशी/तक्रार/26/14/13/2024 पत्र देण्यात आला.तसेच प्रस्तुत प्रकरणी मा. दिवाणी न्यायाधिश खालापूर यांचेस्तरावर रे.मु.क्र.10/2023 व रे.मु.क्र. 21/2024 हे दावे प्रलंबित आहेत.असे पत्र आंदोलन करताना पत्रकरांना दिले.
दुसरीकडे आदीवासी शेतकरी बांधव व भीम आर्मी संघटनाने कडून संताप व्यक्त करीत सांगितले की आम्ही कलम 5 प्रमाणे तहसीलदार यांच्या कडून आम्ही शेतात जाण्यासाठी जुना रस्त्याची वहिवाट खुली करून मागत आहोत आम्ही नवीन रस्ता मांगत नाहीं स.नं.20/2 व स.नं.30/2 टेटस कोप दिलेला आहे आम्हाला तिथे हुकूम मनाई केलेली आहे इथे कुठे मनाई केलेली नाहीं आणि कलेक्टर साहेबांना असे कुठे सांगितले नाहीं आहे जवळ मी निकाल देईन तो पर्येंत तुम्ही निकाल देऊ नय असा कुठेही लिहिलेला नाहीं कुठल्याच कागदावर लिहिलेला नाही आहे… असेल तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला दाखवावा…कोर्टाचा पाठ वेगळा आहे हा पाठ वेगळा आहे…दिशा भूल करतात ती सर्वांची असा संताप व्यक्त करीत आंदोलन करते राजेश चव्हाण व प्रितेश पवार यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले .