रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
देश-विदेशातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्र भुरळ घालत असला,तरी धोकादायक ठरत आहे… पुणे येथून काशीद समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेल्या करण्यासाठी आलेल्या पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २० राहणार-हवेली पुणे) या पर्यटकाचा मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे…मुंबई पुणे पासून एक दिवसीय पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यातील तनिष्क मल्होत्रा यांच्यासहित त्याचे मित्र मार्क मिल्टन (वय २० वर्ष),वरून तिवारी(वय २० वर्ष) ३)पुण्य पाटील( वय २० वर्ष) हे चौघेजण मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी आले होते.तनिष्क मल्होत्रा यांच्यासहित त्याचे मित्र मार्क मिल्टन (वय २० वर्ष), वरून तिवारी(वय २० वर्ष) ३)पुण्य पाटील( वय २० वर्ष) हे पुणे येथे पदवीधरच्या शेवटच्या वर्षात शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. समुद्रस्नान करण्यासाठी तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन,वरुण तिवारी,पुण्य पाटील हे चौघेजण काशीद समुद्रात गेले. तनिष्क मल्होत्रा हा मित्रासोबत खोल पाण्यात समुद्र स्नानासाठी गेला. त्याला पाण्याची खोली (वाव)जास्त असल्या कारणाने त्याला पाण्याच्याबाहेर येता आले नाही तो लाटाच्या सहाण्याने कुठे तरी वाहत जाऊन तो पाण्यात दिसेनासा झाला त्याला शोधण्याचा पोलीस व लाईफ गार्ड यांनी खूप प्रयत्न केला त्याचा शोध चालू आहे…त्याच्यासोबत असलेले त्याचे तीन मित्र मार्क मिल्टन,वरुण तिवारी,पुण्य पाटील यांना वाचवण्यात यश आले आहे.
तनिष्क मल्होत्रा याच्या शोध कार्यासाठी काशीद येथील लाईफ गार्ड तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील सागर पाठक यांच्याशी संपर्क करून त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे रोहा येथील रेस्क्यू टीमचे सागर दहिमकर यांना कळविण्यात आले असून त्यांची टीम आल्यानंतर पुढील शोधकार्य करत आहे.सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आला आहे. परंतु, काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत…त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवहन मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी केले आहे…काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी निदान एक स्पीड बोट तैनात करावी, अशी मागणी पर्यटकांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे…