पनवेल शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर) :-
प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. अॕड.मोहन गायकवाड यांच्या वतीने दि.२ जुलै रोजी हौसाबाई आठवले स्मरणार्थ यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येते…. या उपक्रमांतर्गत नुकतेच स्वर्गीय पार्वतीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज जयंती व विद्यार्थी मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर मंगळवार दिनांक २ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते…. या कार्यक्रमाला केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या शैलीमध्ये मार्गदर्शन केले… यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण डायरी या सुप्रसिद्ध नियतकालिकाचे संस्थापक संपादक सय्यद अकबर, काँग्रेस नेते अरविंद सावळेकर, आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रभाकर गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती….
यावेळी उपस्थित विद्यार्थी मित्रांना संबोधित करताना रामदास आठवले म्हणाले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या…. भाकरी तुमची आजची भूक मिटवेल पण पुस्तकातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे तुम्ही अनेकांची भूक मिटविण्याचे कसब जिंकाल…. ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…. शिक्षण मिळवून देत गरजवंत विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा जो मार्ग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखविला आहे, त्याच मार्गावर प्रा.अॕड. मोहन गायकवाड मार्गक्रमण करत असल्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो….
यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सय्यद अकबर म्हणाले की, आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते…. परंतु कित्येक कार्यक्रम केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आयोजित केलेले असतात…. अशा सगळ्या लोकांनी प्राध्यापक अॕड. मोहन गायकवाड यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे…. आपल्या देशाची पुढची पिढी घडविण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मार्गदर्शन शिबिर अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतात…. मोहन गायकवाड यांच्या या अत्यंत स्तुत्य कार्यक्रमाचे मी मुक्तकंठाने कौतुक करतो तसेच अशा कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये आम्हा पत्रकार बांधवांचे नेहमीच सक्रिय सहभाग असतील अशी ग्वाही देतो….