रायगड शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-
जिल्हा परिषदेतील जीओ टॅगिंग प्रणालीबाबत ठेकेदार युनियन आक्रमक झाली आहे…. त्रासदायक ठरणारी सदरची प्रणाली रद्द करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे…. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले….
महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही मोजक्या म्हणजेच तीन जिल्ह्यांकरिता जीओ टॅगचा जी.आर. काढून त्या तीन जिल्ह्यांपैकी त्यात रायगड जिल्हा परिषदेचे नाव नमूद केलेले आहे…. त्यामूळे आम्हा ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याकारणाने आम्ही यापुर्वी आपल्या कार्यालयाकडे २४/०६/२०२५ रोजी पत्र दाखल केले होते परंतू आजतागायत आपल्या कार्यालयाकडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही….
रायगड जिल्हा हा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे इंटरनेटची सुविधा नाही… जिओ टॅगींग ही प्रणाली पुढील काही महिन्याकरीता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिल अदा करावीत, असे नमूद करण्यात आले आहे….