पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्री.देवेंद्र अनंत पाटील यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा फेरनिवड झाल्याबद्दल देवेंद्र पाटील यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
अलिबाग येथील शेतकरी भवनात शुक्रवारी संपन्न झालेल्या चिटणीस मंडळाच्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.शेकापक्षचा एकनिष्ठ व निष्ठावंत युवा तरुण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.देवेंद्र पाटील यांचे कार्याची दखल घेत पुन्हा पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा फेर निवड करत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र पाटील यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल शेकापचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा विधान परिषदेचे माजी आमदार भाई जयंत पाटील,माजी आमदार बाळाराम पाटील साहेब,शेकापचे जिल्हा चिटणीस व आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश शेठ खैरे,शेकापचे राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुलशेठ म्हात्रे,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत,महाराष्ट्र राज्य प्रवक्ते चित्रलेखा नृपाल पाटील,महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मानसीताई म्हात्रे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवानीताई संतोष जंगम,शेकापचे जिल्हा सहचिटणीस अँड गौतम पाटील,जिल्हा सहचिटणीस तेजस्वी घरत,शेकापचे कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप नाईक,शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर तसेच आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देवेंद्र पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.