पंढरपूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विठू दासांचा मेळा…भक्तांचा सागर…समानतेचा संदेश…कपाळावर टिळा…गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम… असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून वारकरी समुदायाची परंपरा लाभलेली आहे…दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त असंख्य वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जात असतात…काही वारकरी १५ दिवस आधीपासूनच वाऱ्या सुरु करतात…अनेक ठिकाणांहून पायी दिंडी तर काही ठिकाणांहून वाहनाने एकादशीच्या आदल्या दिवशी वारकरी पंढरपूर येथे मुक्कामाला जातात…कारण वारी हा ऐकायचा किंवा पाहायचा विषय नसतो,तर तो अनुभवायचा विषय असतो…त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी करायलाच पाहिजे…
याप्रमाणेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल तालुकाप्रमुख संदीप तांडेल व योगेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली दिंडीला सुरुवात झाली…आषाढी एकादशीनिमित्त पनवेल तालुक्यातील वावंजे,शिरवली विभागातील वारकऱ्यांनी देखील चींध्रण ते पंढरपूर अशी वारी केली…४ ते ७,जुलै असे तीन दिवसीय दिंडीचे आयोजन केले होते…टाळ मृदुंगाच्या गजरात भजन गात वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले…या दिंडीत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…पंढरपुरातील या हजारो वारकऱ्यांची सेवा करण्यात आली…जगद्गुरू संत तुकोबारायांचा…आम्ही विठ्ठलाचे वीर,कळी काळाचे फोडू शीर…असा अभंग आहे…वारकरी म्हणजे अन्यायावर,अंधश्रद्धेवर वार करणारा योद्धा…या आवेशातच वावंजे विभागातील विठ्ठलाचे वीर पंढरीला गेले होते…या दिंडीला ह.भ.प. श्री.निवृत्ती महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन देखील मिळाले…वारी पंढरपुरात दाखल होताच वारकऱ्यांचा जल्लोष आणखी वाढतच गेला…पंढरपुरात दाखल झाल्यानंतर अगदी तरुणांसह वृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान निराळेच होते…
वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना दोन घास खाऊ घालावे…व यातून माऊलींची सेवा व्हावी या उद्देशाने योगेश शेठ तांडेल व परिवाराकडून वारकऱ्यांसाठी तीन दिवसीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती…यानंतर गेल्या काही दिवसांपासून वारकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते…तो सोनियाचा दिवस म्हणजेच ६ जुलै आजचा दिवस उजाडला…आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली…भाविकांची विक्रमी गर्दी,टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली… सकाळीच विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर हरिपाठ व भजन कीर्तनात पुरुषांसह महिला देखील रंगल्या होत्या…दोन दिवस रात्रभर जागरण करून भजन,गायन,कीर्तन करण्यात आले…पुरुष व महिलांनी रिंगण घालुन फुगडी,खेळ,गरबा खेळून आनंद व्यक्त केला…वारकरी परंपरेनुसार एकमेकांस नमस्कार करून आषाढी एकादशीचा दिवस उत्साही वातावरणात पार पडलाय…
संदीप तांडेल,योगेश तांडेल यांनी केलेल्या धार्मिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घडवल्याने त्यांनी देखील तांडेल परिवाराला आशीर्वाद दिले आहेत…