विघ्नेश कोळी व लोकेश कैलास पाटीलला सीए परिक्षेत उत्तुंग यश… गरिबी,अडथळे व मर्यादांवर मात करून यश मिळवल्याची माहिती…

0
56

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

          जुलै २०२५ – २०२६ जुलै मह घोषित झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षेच्या निकालात उरण तालुक्यातील करंजा येथील विघ्नेश कोळी आणि भेंडखळ गावातील  सुपुत्र लोकेश कैलास पाटील यांनी अत्यंत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

तत्कालीन रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली अभ्यासिका’ उरण नगरपालिका संचलित माॅं साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयाचे विद्यार्थी असलेल्या विघ्नेश कोळी, रा. करंजा-उरण यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण उरणसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

वाचनालयात अभ्यास करणारा, ध्येयवेडा, आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखला जाणारा विघ्नेश अनेक दिवसांचे अथक परिश्रम आणि संयम यांचं प्रतीक ठरला आहे. गरिबी, अडथळे आणि मर्यादांवर मात करून त्याने हे यश मिळवलं आहे.

तर भेंडखळ गावातील सुपुत्र लोकेश कैलास पाटील यांनी  उत्तम यश संपादन केले आहे.भेंडखळ ग्रामस्थानी आणि पाटील परिवारातुन अभिनंदन केले आहे  तर  भेंडखळ गावातील पाटील परिवारातुन राजस प्रविण पाटील यांनी  पहिल्याच  प्रयत्नात  सन २०२१ साली  सी.ए होण्याचा  मान मिळाळा होता.या यशामध्ये विघ्नेश कोळी यांना उरण नगर परिषद प्रशासनाने केलेले सहकार्य हे देखील अधोरेखित करण्यासारखे आहे असं वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष पवार आणि ॲड निरंतर सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर लोकेश पाटील यांना आई वडील  आणि  शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विघ्नेश आणि लोकेश आता समाजासाठी काम करण्याची इच्छा बाळगतो आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.