सौ. लता तांबे व सौ. मनीषा चोणकर यांच्या निवडीबद्दल भरभरून शुभेच्छा… 

0
1

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार सामाजिक न्यायाच्या कार्यातून समाजातील वंचित-वर्गीय उपक्रमांना नवी दिशा देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण गाठी-भेट दि. शून्य-पाच नोव्हेंबर, दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील तळा तालुका महिला सामाजिक न्याय विभागातील पदाधिकारी नियुक्ती जाहीर होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला… यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार तळा तालुका महिला सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष पदी सौ. लता जनार्धन तांबे (रा. उसरखुर्द, ता. तळा, रायगड) यांची निवड करण्यात आली तर तालुका चिटणीस पदी सौ. मनीषा प्रशांत चोणकर (रा. बावे-मांदरज, ता. तळा, रायगड) यांची अधिकृत नियुक्ती जाहीर झाली…

दरम्यानाचा  काळात या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. सदानंद कृष्णाजी येळवे यांचे मार्गदर्शन, मेहनत, दृष्टीकोन आणि अध्यवसाय अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या पुढाकारामुळे महिला नेतृत्वाला सक्षम संधी मिळाली असून तळा तालुक्यात नव्या ऊर्जेला दिशा मिळाली आहे…विभागातील प्रत्येक स्तरावरील समन्वय, सुचवलेली नावे व अंतिम निवडीपर्यंत निर्णयप्रक्रिया यामध्ये येळवे साहेबांची भूमिका अत्यंत प्रशंसनीय मानली जात आहे. पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांचे मनःपूर्वक आभार मानले गेले. या वेळी मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा पुढील प्रमाणे-बाबासाहेब घुमरे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग), बाळासाहेब कसबे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश), नागराळे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग),विवेक कांबळे, नाशिक, कोकिळाताई वाहूरवाघ (जिल्हाध्यक्षा अकोला महिला सामाजिक न्याय विभाग),अंभोरे मॅडम, अकोला, हर्षद जाधव (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभाग),सुधीर कांबळे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य) यांची मान्यवर उपस्थिती लाभली..

दरम्यान नियुक्त झालेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छांद्वारे अभिनंदन केले. महिला नेतृत्वाच्या या दृढ पावलाने विभागाच्या कामात गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. या गाठी-भेटीतून तळा तालुक्यासाठी नवीन नेतृत्व निर्माण झाले असून सामाजिक न्याय कार्यास महिला शक्तीची नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. सौ.लता तांबे व सौ.मनीषा चोणकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून तळा तालुक्यातील सामाजिक उपक्रमांना यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रायगड जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र हरीचंद्र चव्हाण यांनीही मनःपूर्वक शुभेच्छा देत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. सौ. मनीषा चोणकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत असून तळा तालुक्यातील सामाजिक उपक्रमांना यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रायगड जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र हरीचंद्र चव्हाण यांनीही मनःपूर्वक शुभेच्छा देत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.