फुले, शाहू ,आंबेडकरी विचारांचे पुरोगामी सरकार सत्तेत आणाणर… महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे:शरद पवार…

0
10

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे  सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. नव्याने उभे राहिलेले नाट्यगृह कलाकारांसाठी एक पर्वणीच आहे…

या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल, असे पवार यांनी सांगितले. शेकाप नेते जयंत पाटील पक्षाला मजबूत व बलाढ्य करण्याची भूमिका ठेऊन काम करीत आहेत. ते एक लढवय्ये नेते आहेत. शेकापचे नेते आपल्या तत्व, ध्येय व धोरणांशी एकनिष्ठ राहतात. ते तत्वाशी कधी तडजोड करीत नाहीत. पाटील कुटुंबाशी माझे कौटुंबिक संबंध असून  भविष्यात हे नाते अधिक घट्ट होईल असे शरद पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगडमधील अलिबागमधील पीएनपी थिएटरच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पीएनपी थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले आहे. या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार नीलेश लंके, सुषमा अंधारे, चित्रलेखा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.