अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर ):-
निलेश लंके यांनी प्रसाद गायकवाड यांच्या परिवाराला भेट दिली…. यावेळी त्यांनी प्रसाद गायकवाड यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले…. ते म्हणाले की, प्रसाद गायकवाड हे आमचे सहकारी असून, ते नेहमी तळागाळातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणार आमचा सहकारी आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे… त्यांच्यासोबत आमची ज्या ज्या वेळेस भेट होते त्या त्या वेळेस हवं प्रश्न असतो कि, माझ्या भागातील लोकांना न्याय हा मिळालाच पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे… म्हणजेच सर्वसामान्यांसाठी झटणारा हा सहकारी आहे… त्यांनी कोविडच्या काळात या भागातील लोकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे सेवा देण्याचं काम पिंट्या गायकवाड यांनी केलं होतं… नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारा हा परिवार आहे… त्यामुळे या परिवाराचा आम्हाला गर्व आहे… सहाजिकच या परिवाराला सामाजिक चळवळीचा वारसा लाभला आहे…
यावेळी निलेश लंके यांनी ५ तारखेच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, ही गोष्ट निश्चितच समाधानकारक असल्याचे सांगितले… तसेच कुटुंबामध्ये राजकीय मतभेद असू नये, कुठलेही कुटुंब अखंडित एकसंघ राहिले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले….