रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठा वाद… शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार थोरवे यांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका…

0
11

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

                रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला असून, कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे… पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत नाराजीचा सूर चढला असून, महायुतीत तणाव वाढत चालला आहे.कर्जत येथील आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आमदार थोरवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करत,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं. आता मात्र भाजप सरकार असूनही, शिवसेनेच्या आमदारांना हे पद मिळत नाही, हे दुर्दैव आहे,असे त्यांनी सांगितले…थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत,रायगडमधील विकासकामांसाठीचा निधी तटकरे यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवला जातोय. शिवसेनेच्या आमदारांना विकासासाठी दुय्यम वागणूक दिली जाते,” असा आरोपही केला.

शिवसेनेने सार्वजनिकरित्या आता भारत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रिपदावर नियुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील समस्यांचा अनुभव आहे, असे कारण पुढे करण्यात आले आहे.या वादामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेने आतापर्यंत राष्ट्रवादीवर टीका केली होती,मात्र आता थेट फडणवीसांवर लक्ष केंद्रित करत वातावरण अधिक तापलं आहे…त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

रायगडमध्ये सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. पालकमंत्री भाजपचा हवा होता. मात्र भाजप पक्ष धोरणं मानतो. आमदार थोरवे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळवून देण्यात एकनाथराव शिंदे कमी पडले त्यांनी त्यांची तुलना उद्धव ठाकरे यांचे बरोबर करायला हवी होती.त्यात फडणवीस साहेबांचा काही संबंध नाही. त्यांनी फडणवीस साहेबांना दुषण देऊ नये…