अटल सेतू आत्महत्येचा केंद्र…अटल सेतूवरुन डॉ.ओंकार कवितेक यांनी मारली उडी; शोध मोहीम सुरूच…

0
32

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

३२ वर्षांचे डॉ.ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री ७  जुलै ओ२०२५ रोजी अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले- “लवकरच जेवायला घरी येतो.” मात्र ते कळंबोलीमधील आपल्या निवासस्थानी कधीच पोहोचले नाहीत.

दरम्यान,७ जुलै रोजी रात्री सुमारे ९  ते १० च्या दरम्यान, त्यांनी अटल सेतूवर त्यांची होंडा अमेझ कार थांबवली आणि पुलाच्या कठड्यावरून थेट खाडीत उडी मारली.सदर घटनेच्या ठिकाणी उलवे पोलीस पोहोचले असता,त्यांना गाडी आणि ओंकारचा आयफोन सापडला.मोबाईलमधून प्राप्त झालेल्या माहितीवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला.

डॉ. ओंकार कवितके मागील सहा वर्षांपासून जे. जे. रुग्णालयात कार्यरत होते आणि आईसोबत कळंबोली परिसरात राहत होते. घटनेच्या कारणांबद्दल अद्याप स्पष्टता नसून पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांशी चौकशी करण्यात येत आहे.