चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
लायन्स क्लब खालापूर यांचा श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर महड येथे पदग्रहण कार्यक्रम संपन्न झाला, सन २०२५/२६ साठी हभप.किशोर पाटील यांची खालापूर तालुका लायन्स पदी निवड करण्यात आली…सदर कार्यक्रमासाठी लायन संतोष चव्हाण इंस्टालेशन ऑफिसर, लायन प्रमोद दालमिया डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेजरर, लायन विजय गणांत्रा सेकंड वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, लायन ज्योती देशमाने एक्स्टेंशन चेअरपर्सन, लायन घोडके झोनल ऑफिसर,लायन धरम पाल,लायन शिवानी जंगम अध्यक्षा लायन्स क्लब खालापूर, रामदास काईनकर,मधुकर म्हसे, खालापूर नगर पंचायत अध्यक्ष रोशनी मोडवे, सरपंच सौ. दिपाली पाटील, गुरुवर्य रामदास महाराज पाटील, माजी नगरसेवक किशोर पानसरे,अविनाश राऊत अध्यक्ष खोपोली लायन्स क्लब लायन निजामुद्दीन शेख,लायन विशाल बियाणी, लायन कासार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवीन कमिटी लायन्स क्लब खालापूर च्या अध्यक्ष पदी लायन किशोर नामदेव पाटील,प्रथम उपाध्यक्ष पदी लायन भरत पाटील,द्वितीय उपाध्यक्ष पदी लायन हरिभाऊ जाधव, सचिव पदी लायन लहू भोईर, ट्रेजरर पदी लायन जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रम ची सुरवात दिप प्रज्वल व स्वागत गीताने झाली. लायन शिवानी जंगम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. लायन किशोर पाटील यांनी क्लब चा २०२४/२५ चा सचिव अहवाल सादर केला.लायन्स क्लब खालापूर मध्ये नवीन पाच सभासद यांचा शपथविधी पार पडला. स्पॉट ऍक्टिव्हिटी म्हणून गुरुकुल महड येथील साधक विद्यार्थी यांना ज्ञानेश्वरी पारायण प्रत, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनुचक्षु संस्था महड या संस्थेस अन्न धान्य व किराणा माल देण्यात आला. शिरवली खालापूर येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हेल्प फौंडेशन व अपघातग्रस्त संस्था यांच्या कार्याचा लायन्स क्लब खालापूर कडून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. लायन सभासद यांच्या १० वी १२ उत्तीर्ण व पदवी प्राप्त मुलांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. लायन शिवानी जंगम यांनी लायन्स क्लब खालापूर चे अध्यक्ष पद भूषविताना केलेल्या उल्लेखनीय कामाचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष लायन किशोर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लायन्स क्लब ची माहिती, उद्दिष्ट सांगितली व पुढील काळात करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष लायन किशोर पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच त्यांचे मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रम च सूत्रसंचालन लायन महेंद्र सावंत यांनी केले.