विलास शिंदेंनी माणगाव येथील बैठकीत SBI च्या विश्वासार्हतेवर व पारदर्शकतेवर भर दिला…

0
24

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

नवीन आनंद भवन हॉटेल येथे आयोजित ग्राहक मेळाव्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विलास सुखदेव शिंदे यांनी बँकेच्या पारदर्शकतेवरील निष्ठा,सायबर जनजागृती व सर्वसमावेशक “मास बँकिंग” धोरणावर भर दिला. त्यांनी अभिमानाने सांगितले की,SBI ही भारतातील सर्वोच्च रँकिंगची बँक असून, संपूर्ण जगात पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विश्वासार्ह बँक म्हणून ओळखली जाते, याचे मुख्य कारण म्हणजे सर्व शाखांमध्ये एकसारखे नियम अंमलात आणले जातात.

या “टाउन मीट” चा उद्देश डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करणे, बँकेची उत्पादने सादर करणे आणि ग्राहकांकडून मौल्यवान अभिप्राय मिळवणे असा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.ग्राहकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की,जसे एखाद्या दुकानदाराला अधिक ग्राहक आले की आनंद होतो, तसेच आम्हालाही SBIच्या शाखांमध्ये वर्दळ असली की समाधान वाटते — कारण ते विश्वास आणि सहभाग दर्शवते.”

शिंदे यांनी यावेळी आश्वासन दिले की, लवकरच माणगाव शाखेत स्वतंत्र ग्राहक स्वागत काउंटर सुरू करण्यात येईल, जेणेकरून सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही SBIची सेवा सुरळीत, कार्यक्षम व ग्राहकाभिमुख ठेवण्यास वचनबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.या कार्यक्रमातून SBIची जनतेशी थेट संपर्क साधण्याची, विश्वास जपण्याची व लोकाभिमुख बँक म्हणून आपली प्रतिमा अधिक बळकट करण्याची भूमिका ठळकपणे अधोरेखित झाली.