नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
सकल ओसवाल श्वेतांबर जैन संघ, जॉइन्डस ग्रुप व सहली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नांदगाव शहरातील ओसवाल भवन येथे मोफत नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी व नेत्रदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २२० नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराची सुरुवात नवकार महामंत्र “णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं, णमो आयरियाणं, णमो उवज्झायाणं, णमो लोए सव्वसाहूणं” या मंगल घोषात करण्यात आली. जैन साध्वी विचक्षणाजी महाराज आणि दर्शना जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने या कार्यक्रमाला आध्यात्मिक सन्मान लाभला.
कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख, शांतीलाल सुराणा दत्तराज छाजेड, सचिन खरोटे, वामन पोतदार, तसेच माजी नगरसेविका वंदना कवडे यांची उपस्थिती लाभली.
शिबिराचे विशेष आकर्षण ठरले नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रमोद बोराडे व त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांचे मार्गदर्शन, ज्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची नेत्र तपासणी अत्यंत प्रभावीपणे पार पडली.या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदाना संबंधी जनजागृती निर्माण झाली.“नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे. अशा सेवाभावी उपक्रमांची नांदगाव शहरात नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त करत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.हा उपक्रम केवळ तपासणीपुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला आहे. भविष्यातही अशाच उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली…कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कचरदास चोपडा ऋषभ सुराणा, कमलेश खिलोशिया निलेश सुराणा कमलेश सुराणा यांनी परीश्रम घेतले