स्मार्ट मीटर वाद… महाड मनसेची महावितरणवर धडक…

0
16

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :- 

महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये स्मार्टमीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी महाड येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली.

महाड शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आपली मागणी लेखी निवेदनाद्वारे सादर केली.सादर केलेल्या निवेदनात स्मार्टमीटर बसवण्याची सक्ती, त्यानंतर विजबिलांमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि अन्य विविध तांत्रिक त्रुटींवर आक्षेप नोंदविण्यात आला.

यावेळी माध्यमांशी बोलताना उमासरे म्हणाले की नागरिकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बसवले जात असून त्यातून विजबिलात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.ही सक्ती अन्यायकारक असून मनसे याचा तीव्र निषेध करत आहे आणि याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.