माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा २७ जुलै रोजी माणगाव तालुक्यात वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला…याचवेळी वाढदिवसाचे औचित्य साधून माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसैनिक यांनी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले…यावेळी उपस्थित शहरप्रमुख व नगरसेवक अजित तार्लेकर,माणगाव तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे,युवाउपशहर प्रमुख अभिजीत घोणे,युवाशहर प्रमुख अजिंकेश जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी यांच्याहस्ते फळ वाटप करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे १९९७ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली.त्यांनी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत ती यशस्वीरीत्या पूर्ण केली… या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण संपूर्ण राज्याने अनुभवले…२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले…आज २७ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…