महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असून महाड विधानसभा मतदारसंघात नामदार गोगावले यांनी पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच ठेवला आहे.एकीकडे राष्ट्रवादीमार्फत आर्थिक तडजोड करून माणगाव मध्ये शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मंत्री भरतशेठ गोगावले मात्र आपल्या विकास कामाच्या जोरावर आणि समता आणि बंधुत्व यांच्या माध्यमातून महाड तालुक्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्के देत आहेत. जगताप कुटुंबांच्या सदैव पाठीशी राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका सरचिटणीस आणि खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या समवेत संजय नरसिंग देशमुख, संतोष श्रीरंग देशमुख, रोहन राजेंद्र देशमुख, सागर संतोष देशमुख, सुशांत कैलास देशमुख, सुयोग संतोष देशमुख त्याच पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाड तालुका उपाध्यक्ष सर्वेश संजय देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री गोरगरिबांचे कैवारी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे…या पक्षप्रवेशावेळी नामदार भरतशेठ गोगावले, शिवसेना शेतकरी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आप्पा सावंत, रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र तर्डे उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, उपतालुकाप्रमुख सुनील खंडेराव देशमुख,वरंध विभाग संपर्कप्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, उपविभाग प्रमुख राजेंद्र देशमुख, सुरेश मोरे, भाऊ दिविलकर, शेखर देशमुख, शाखाप्रमुख किरण देशमुख, प्रशांत धनवडे, स्वप्निल देशमुख, संजय देशमुख, प्रीतम देशमुख, राहुल देशमुख, कैलास मालुसरे, योगेश देशमुख, वैभव देशमुख, संदीप मामा कदम इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.