म्हसळा शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
पैशाच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल असे सांगता येत नाही.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर येथील दागिन्यांच्या हव्यासापोटी दोन अल्पवयीन मुलानी हत्या केली असल्याची घटना म्हसळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर गावात शेवंती सखाराम भावे (वय ८० वर्षे) ह्या एकट्याच घरात राहत होत्या. त्यांचा मुलगा कुटुंबासह नोकरी निमित्त मुंबई महानगर पालिका हद्दीतील बोरिवली या उपनगरात वास्तव्यास आहे. मंगळवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी शेवंती सखाराम भावे यांच्या घरातील टीव्हि बंद पडला होता. बंद पडलेला टीव्ही दुरुस्त करण्यासाठी राज (बदलले नाव वय 16 वर्षे, कणघर, म्हसळा) याला घरी बोलावून घेतले. आणि त्याला शेवंती भावे यांनी बंद पडलेला टीव्ही दुरुस्त करण्यासाठी टीव्ही दुरुस्त करणारा कोणी असेल तर बोलावून घे असे सांगितले. राज याने या संधीचा फायदा घेत त्वरित त्याचा मित्र राज याने त्वरित आपला मित्र अण्णा (बदललेले नाव वय 17 वर्षे, खामगाव म्हसळा, रायगड) याला कॉल करून बोलावून टीव्ही दुरुस्त करण्याचा बहाणा करीत अण्णा याने वृद्ध महिला शेवंती सखाराम भावे यांच्याकडून एक हजार रुपये टीव्ही दुरुस्ती शुल्क मागून घेतले.शेवंती सखाराम भावे यांच्या घरातील टीव्हि दुरुस्त केल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित दिसत नसल्या कारणाने शेवंती भावे यांनी राज व अण्णा या दोघांना २३ जुलै २०२५रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले…
शेवंती भावे यांनी राज व अण्णा या दोघांना टीव्ही दुरुस्त करूनही तो का दिसत नाही असा जाब विचारला असता त्या तिघांमध्ये बाचाबाची होत भांडण झाले. सदर भांडण होत असताना राज व अण्णा या दोघांचे वृद्ध महिला शेवंता भावे यांच्या कानातील सोन्यावर केंद्रित झाले.शेवंती भावे यांच्या कानातील सोना बघून त्यांना त्याची हाव सुटली. राज व अण्णा यांनी आजूबाजूला बघीत वृद्ध महिला शेवंती भावे यांचा गळा दाबून हत्या केली. वृद्ध महिला हिची झालेली हत्या ही हत्या न वाटता नैसर्गिक मृत्यू वाटावा म्हणून तिला शांतपणे पलंगावर झोपविले आणि वीस हजार रुपये किमतीचे कानातील , तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळ्या, वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे पॅण्डल असा एकूण सत्तर हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन निघून गेले.त्यानंतर वृध्द महिला शेवंती सखाराम भावे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. अशा पध्दतीने राज व अण्णा हे नागरिकांमध्ये वावरत होते. मृत महिलेचा अंत्यविधी पार पडून चार दिवस उलटून दागिने गेले कुठे?, याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता वृद्ध महिलेचा खून झाला असल्याचे लक्षात आले.मृत वृद्ध महिला शेवंती सखाराम भावे यांचा मुलगा सुरेश भावे याने २६ जुलै २०२५रोजी मध्यरात्री सुमारास आईचा खून करून सोन्याचे दागिने गायब झाल्याबद्दल म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कहाले आणि त्यांचे पोलिस पथकाने शिताफीने शोध घेतला. या प्रकरणात १६ व १७ वर्षीय दोन अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३११ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कर्जत येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे…