रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व,कोकण नेते व्हि. के. जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले असून आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज , राष्ट्र आणी देशहितासाठी समर्पित केले. बहुजन महापुरुष, महानायिका यांचे लढावू, क्रांतिकारी, परिवर्तन वादी विचार घराघरात तळागळात पोहचविण्या साठी त्यांनी आयुष्य भर काम केले. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचे काम मोठे राहिले असून निष्ठावान कार्यकर्ते घडविण्याचे काम ते नेहमी करत असत . दिवंगत नेते व्हि. के जाधव यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू ,दानशूर आणि धाडसी नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली आहे. ते कायम त्यांच्या विचाराने, कार्याने समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील असे प्रतिपादन प्रथम पुण्यस्मरणनिमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. दिवंगत व्हि. के. जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन नुकताच शांतिदुत फार्महाऊस वांगणी येथे पार पडला. यावेळी व्हि के. जाधव यांच्या समाधी स्थळी जाऊन उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस. एन गायकवाड यांनी भूषविले.यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.