उरण तालुक्यातील कंटेनर यार्ड गोदाममध्ये नियमांची ऐशीतशी… गोदाम  परिसरात ३० % रोप लागवडीकडे दुर्लक्ष…

0
32

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

उरण तालुक्यात कंटेनर यार्ड, गोदाम उभारताना प्रकल्प परिसरात ३० % जागेत रोप लागवड करणे बंधनकारक आहे… पंरतु गोदाम मालक या नियामांची पायमल्ली करित असुन ३०% रोप लागवड न केल्याने उरण तालुक्यातील तापमानात प्रंचड वाढ झाली आहे…

उरण तालुक्यात अधिकृत आणि अनाधिकृत १०० पेक्षा अधिक गोदामे आहेत… काही गोदामे डोंगर पोखरून, वन विभागाचे जमीनी हडप करून नैसर्गिक नाले बंद करून गोदामे उभी राहिली आहेत… तर खोपटे गावात सी.आर.झेड.चे उल्लंघन करून, खाडी, नाल्यावर भराव टाकून उभी राहिली आहेत…

तसेच प्रत्येक गोदामात प्राथमिक उपचारासाठा दरदिवशी डॉक्टर रुग्ण वाहिका, शव वाहिनी असणे आवश्यक आहे… तसेच आंगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोदाम चा सर्व बाजुने अग्निशमन व्यवस्थापन असणे आवश्यक आहे… त्याची रंगीत तालीम दरमहिन्याला होणे बंधनकारक आहे…

सदर गोदाम उभी करताना प्रशासन, कस्टम, महसूल विभाग, सिडको आणि नैना प्राधिकरण विभाग कडुन परवानाग्या दिला जातात… पण गोदाम  मालक दिलेल्या परवानगीची नियम धाब्यावर बसवून ऐशीतैशी करित आहेत… गोदाम  मालक प्रशासनातील अधिकारी चा अथिॅक व्यहारा मुळे नियम  बासनात गुंडाळून ठेवण्यात येत आहेत… याचे परिणाम  उरण तालुक्यातील जनतेला भोगावे लागणार आहेत…