इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या अधिकारी तृप्ती सोनवणे यांची दणदणीत कारवाई! तलवारीचा धाक दाखवत लूटमार व तोडफोड करणारी गुन्हेगारांची टोळी अटकेत!

0
23

नाशिक शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

“उदरक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत इंदिरानगर पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत…. दामोदर चौकातील एस. के. चायनीज हॉटेल वर तलवारीने दहशत माजवून लूटमार व तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे….

ही कारवाई इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली…. त्यांच्या झंझावाती नेतृत्वाने नाशिक पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांमध्ये “रणरागिणी” ही प्रतिमा अधिक बळकट केली आहे….

या कारवाईत विठ्ठल आनंद मते वय 21, सम्यक संदीप उनावणे वय 19, रितेश हरिभाऊ लाते वय 19, ओम राजू भदरगे वय 19 हे आरोपी अटक केले आहेत…या टोळीतील दोन आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली….

सदर कारवाई दिनांक 27 जुलै 2025 रोजी रात्री, आरोपींनी तलवारी तळपत एस. के. चायनीज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि “किशा, मला दोन हजार रुपये दे, नाहीतर तुझं हॉटेल उद्ध्वस्त करू” अशी धमकी देत गल्ल्यातून रोख 4 ते 5 हजार रुपये जबरदस्तीने लंपास केले…. त्याआधीही मुख्य आरोपी विठ्ठल मते याने फिर्यादी कडून दर महिन्याला खंडणी स्वरूपात पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले आहे…. गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पोनि संतोष फुंडे, पोए अमजद पटेल, पोना सागर परदेशी, पोशि दीपक शिंदे व पोशि योगेश जाधव यांनी स्वराज्य नगर येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले…. सदर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली…. या प्रकरणात भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 308 (4), 310 (2), 324 (4) (5), 351, 352 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

या जलद आणि अचूक कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे…. इंदिरानगर पोलीस ठाण्याने दाखवलेली तत्परता ही नाशिक पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची साक्ष आहे…. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना ही कारवाई मोठा धक्का ठरली आहे…. सदर कारवाई बाबत पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली…