मालेगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
गुन्हेगारीला आवर घालण्याचा निर्धार घेत,मालेगाव तालुका पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे.पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव फाटा येथे सापळा रचून फैजल इब्राहिम तांबोळी (रा. हीरापुरा, मालेगाव) याला रंगेहाथ अटक करण्यात आली.तपासादरम्यान आरोपीकडून १५ उच्च दर्जाचे मोबाईल हाती लागले, ज्यांची अंदाजे किंमत ₹१.१४ लाखांपेक्षा अधिक आहे. या प्रकरणी गु.र.नं. 577 अन्वये भा.दं.वि. कलम २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या यशस्वी कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक शिंदे,पोलीस हवालदार सावंत, पो.ना. वाकळे आणि पो.का. पगारे यांनी मोलाची भूमिका बजावली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या गुन्हेगारी निर्मूलन मोहिमेला बळ देत, “सद्क्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा,असे आवाहनही निरीक्षक प्रितम चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.मालेगाव ग्रामीण परिसरातील नागरिकांनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक करत, त्यांचे आभार मानले आहेत.