खालापूर टोल नाक्यावर कंत्राटी कामगाराकडून बोगस व्हीआयपी पासची विक्री… खालापूर पोलिसांनी आरोपीला केले गजाआड…

0
18

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

खालापूर तालुक्यात जणूकाही झटपट पैसा कमविण्याची शर्यतच सुरू आहे की काय अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली असून एका पाठोपाठ एक घटना समोर येत असून गोदरेज कंपनीच्या प्रकरणा नंतर आता आय आर बी कंपनी मध्ये सुरक्षारक्षक तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या कामगाराने आय आर बी कंपनी चा फ्री टोल करण्यासाठी आय आर बी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा व्ही आय पी पासेस विक्री केल्याचे समोर आल्याने याबाबत आय आर बी कंपनीच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती…याबाबत जाबजबाबा नंतर पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल  यांच्या आदेशानुसार खालापूर पोलिसांनी या आरोपी वर गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले,असता खालापूर न्यायालयाने अधिक तपासासाठी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे… या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे…

या संदर्भात सोमनाथ घार्गे हे अधीक्षक असताना सुद्धा याबाबत तक्रार अर्ज करण्यात आले होते… मात्र त्यांनी त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याची चर्चा सुरू आहे… मात्र पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड जिल्हा अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेकायदेशीर कामांना आळा घालण्याच्या सपाटा लावला आहे… यामुळे त्यांना लेडी सिंघम देखील संबोधण्यात येऊ लागले आहे…