निफाड पोलीस ठाण्याची सजगता… आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त…

0
14

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

निफाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी 12.00 ते 1.15 या वेळेत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी रूट मार्च आयोजित करण्यात आला.सदर रूटमार्चासाठी मा.पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये आणि क्र.कक्ष-14/रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स रूटमार्च 4220/2025 दिनांक 28/07/2025 च्या अधिपत्रानुसार नियोजन करण्यात आले होते…

या रूट मार्चमध्ये आरएएफ 102 बटालियन,मुंबई यांचे 2 अधिकारी आणि 33 जवान सहभागी झाले होते.त्यांच्या बरोबरच निफाड,लासलगाव आणि सायखेडा पोलिसांची एकूण 30 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी सहभागी होते.
SDPO कार्यालय निफाड येथून सुरुवात होऊन पिंपळगाव रोड,मटण मार्केट,आंबेडकर नगर, चांदणी चौक, मुसलमान गल्ली, संग्राम गल्ली, झेडपी शाळा, शिंपी गल्ली, जामा मस्जिद, सराफ बाजार, शनी मंदिर, नवीन सरकारी दवाखाना, उगाव रोड, उगाव चौफुली, शांतीनगर चौफुली, मार्केट यार्ड, बस स्थानक, वैनतेय शाळा आणि पुन्हा SDPO ऑफिसपर्यंत रूट मार्च करण्यात आला.या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास वाढवण्याचे कार्य केले.यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.