शशिकांत शिंदे यांचा कळंबोली जाहीर सत्कार… कळंबोलीतील नागरिकांचा शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश…

0
15

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दिपक कांबळे):- 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा कळंबोली येथे माजी नगरसेवक सतीश पाटील व माथाडी कामगार यांच्यावतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता…आपला माणूस अध्यक्ष झाला या भावनेतून सतीश पाटील यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले…यावेळी कळंबोलीतील रहिवाशांनी तसेच धनगर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला…. यावेळी कार्यक्रमाला माथाडी कामगारांचे नेते तसेच हिंदुस्तान बँकेचे चेअरमन विलासराव जगताप, माजी नगरसेवक सतीश पाटील, तुषार पाटील, भावनाताई घाणेकर, महबूब शेख, शहबाज पटेल, राजश्री कदम सह मान्यवर उपस्थित होते…